भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या “रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण” या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तीव्र टीका केली आहे.
नांदेडमधील प्रचारसभेत केलेल्या या विधानावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अशोक चव्हाणांनी पक्ष बदलल्यानंतर संस्कृती, भाषा आणि विचारधारा देखील बदलली आहे. मतदारांचा अवमान करणारे आणि राजकारणाची पातळी घसरवणारे हे वक्तव्य असल्याचा आरोप त्यांनी केला.
यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?
“अशोक चव्हाणांनी स्वतःचीच किंमत कमी करून घेतली आहे.”
“वडिलांची प्रतिमा आणि राजकीय वारसा ते विसरत आहेत.”
“मतदारांची किंमत केवळ एका मटणापुरती ठेवणे हा अपमान आहे.”
या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रचाराच्या पातळीवर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
#AshokChavan
#YashomatiThakur
#PoliticalControversy
#MaharashtraPolitics
#BJPvsCongress
#ElectionPolitics
#NandedNews
#PoliticalStatement
#ViralPolitics
